Amazon

नाशिक विभागात २९ सप्टेंबरला १२२ ठिकाणी रोजगार महाकुंभाचे आयोजन

नाशिक। दि. २७ सप्टेंबर २०२६: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाचे आयोजन २९ सप्टेंबर, २०२६ रोजी नाशिक विभागातील १२२ ठिकाणी करण्यात आले आहे. सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून (ITI) प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या रोजगार महाकुंभात विविध नामांकित औद्योगिक आस्थापना, कंपन्या व उद्योजक सहभागी होणार असून, उद्योगांच्या आवश्यकतेनुसार विविध पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रविवार असूनही आज बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा संप

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कौशल्य प्रशिक्षण तसेच शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना त्यांच्या पात्रता व कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उमेदवारांना संबंधित आस्थापनांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून उपलब्ध पदांची माहिती घेता येणार असून, याच ठिकाणी मुलाखत व निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या सविस्तर

रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी युवकांनी शैक्षणिक व प्रशिक्षण प्रमाणपत्रे, आधारकार्ड, बायोडाटा/Resume, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तसेच आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, तसेच जास्तीत जास्त युवक-युवतींनी रोजगार महाकुंभात सहभागी होऊन उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनिल गावीत, सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, नाशिक यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790