08 ऑगस्ट 2026
आजचे पंचांग: आज ८ ऑगस्ट २०२६ रोजी शुक्ल पक्षातील जेष्ठ महिन्यातील दशमी तिथी दुपारी २ पर्यंत असणार आहे. सकाळी ९ वाजून २ मिनिटांपर्यंत ध्रुव योग जुळून येईल आणि संध्याकाळी ४ वाजून ५१ मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग तर संध्याकाळी ४ वाजून ५२ मिनिटांपर्यंत रोहिणी नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ९ वाजून ३१ मिनिटांनी सुरु होईल ते ११ वाजून ०८ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज अभिजात मुहूर्त सकाळी १२ वाजून १८ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून १० मिनिटांपर्यंत असणार आहे.
मेष राशी:
वैचारिक गोंधळ राहील. त्यातून कोणतेही मत मांडायला जाऊ नका. खर्च वाढते राहतील. संकल्पित कामे पूर्णत्वास जातील. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल.

वृषभ राशी:
हातातील कामात यश येईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. वाचनात मन रमवावे. सामाजिक वादात लक्ष घालू नका. मन प्रसन्न राहील.
मिथुन राशी:
कामाचा आढावा लक्षात घ्यावा. मानसिक गोंधळ टाळावा. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराचा सल्ला घ्यावा.
कर्क राशी:
घरगुती कामे वाढीव राहतील. आळस टाळून कामे करावीत. नवीन प्रकल्पांवर लक्ष केन्द्रित करावे. कामात यथायोग्य बदल संभवतात. कौटुंबिक खर्च वाढता राहील.
सिंह राशी:
स्वावलंबी बनावे लागेल. वास्तविकतेचे भान ठेवावे लागेल. पर्यटनाची योजना तूर्तास आखू नये. अति उत्साह दाखवू नका. निष्काळजीपणा दाखवू नका.
कन्या राशी:
मनाची ताकद ओळखा. नेमकी कृती यश देईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. खर्च आवाक्याबाहेर जाऊ देऊ नका. तुमचा हेतु साध्य होईल.
तूळ राशी
मनातील शंका काढून टाकावी. घाईने निर्णय घेऊ नयेत. विनाकारण शत्रुत्व पत्करू नका. परोपकाराचे महत्त्व लक्षात येईल. नवीन विचारातून शिकायला मिळेल.
वृश्चिक राशी:
बोलण्यात तिरकसपणा आणू नका. उगाच विरोधाला विरोध करू नका. मत सौम्यपणे मांडावे. औद्योगिक वाढीसाठी धोरण बदलणे आवश्यक. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
धनू राशी:
मनातील भावना व्यक्त कराव्यात. स्वयं निर्णयावर भर द्यावा. मनोरंजनात मन रमवावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. वैवाहिक सौख्यात भर पडेल.
मकर राशी
इतरांवर अवलंबून राहू नका. घरातील वातावरण तप्त राहील. जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप कराल. आपल्या उपायांचा चांगला परिमाण जाणवेल. उत्तराला प्रत्युत्तर करू नका.
कुंभ राशी
भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. वाढीव मेहनत करावी लागू शकते. आपल्या कामावर विश्वास ठेवावा. वरिष्ठांचे सहकार्य घ्यावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
मीन राशी:
परस्पर संवादाने कामे होतील. इतरांचे मत जाणून घ्यावे. स्पर्धा जिंकता येईल. करमणुकीत दिवस घालवाल. जोडीदाराचा विश्वास संपादन कराल.
(टीप : वरील सर्व बाबी नाशिक कॉलिंग केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून नाशिक कॉलिंग कोणताही दावा करत नाही.)
![]()
