Amazon

नाशिकरोड, मनमाडसह मुंबई-पुण्याहून दिवाळीनिमित्त ४१८ विशेष रेल्वेगाड्या

नाशिक। दि. २८ सप्टेंबर २०२६: आगामी नवरात्रोत्सव, दिवाळी आणि छठपूजेच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ४१८ विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, हडपसर, नागपूर तसेच नाशिकरोड आणि मनमाड येथून उत्तर भारत, दक्षिण भारत, कोकण आणि गोवा या मार्गांवर विशेष रेल्वेफेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या सविस्तर

सणासुदीच्या काळात नियमित रेल्वेगाड्यांवरील वाढता ताण आणि प्रतीक्षा यादीमुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी या विशेष गाड्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त रेल्वेसेवा उपलब्ध होऊन गर्दीच्या काळातील प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

प्रमुख विशेष रेल्वेगाड्या:
लोकमान्य टिळक टर्मिनस–मऊ द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वे :
या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, मदन महल, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी आणि वाराणसी जंक्शन यांसह विविध स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आज (दि. २७) मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

मुंबई–गोरखपूर विशेष रेल्वे:
दादर, ठाणे, कल्याण, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, मनकापूर, बस्ती आणि खलीलाबाद या प्रमुख स्थानकांवर या गाडीचे थांबे आहेत.

मुंबई–नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वे:
दादर, ठाणे, कल्याण, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या मार्गावर ही विशेष गाडी धावणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक विभागात २९ सप्टेंबरला १२२ ठिकाणी रोजगार महाकुंभाचे आयोजन

दरम्यान, काही विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण २७ सप्टेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर सुरू झाले आहे. उर्वरित विशेष गाड्यांचे आरक्षण २८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. प्रवाशांनी आरक्षणाची उपलब्धता तपासून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790