नाशिक-त्र्यंबकेश्वर वाहतुकीत २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान महत्वाचे बदल

नाशिक। दि. २२ नोव्हेंबर २०२६: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाच्या सहापदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या कामांतर्गत पिंपळगाव बहुला येथील नंदिनी नदीवरील पुलावर गर्डर टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे २४ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत त्र्यंबकरोडवरील वाहतूक दिवसातून तीन वेळा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ट्रकचालकाला फायटरने मारहाण करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

वाहतूक उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, पहाटे ५ ते ६, दुपारी १ ते २ आणि दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गावर प्रवेश बंद राहणार आहे.

या कालावधीत त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे येणारी वाहने महिरावणी-गिरणारे मार्गे वळविण्यात येतील. तर नाशिकहून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी अमृत चौक-अशोकनगर-कार्बननाका-बारदान फाटा हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहराच्या 'या' भागांतील वीजपुरवठा शनिवारी (दि. २१) बंद राहणार !

वाहतूक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790