Amazon

सिंहस्थ कुंभमेळा: रामकुंड परिसरातील कामे ३ आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश

नाशिक। दि. २१ सप्टेंबर २०२६: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा सोहळ्याचा ध्वजारोहण कार्यक्रम 31 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी विकास कामांची गुणवत्ता राखत गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन, कुभमेळा तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

🔎 हे वाचलं का?:  सुरगाण्यात ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप; नाशिक शहरापासून ५३ किलोमीटरवर केंद्रबिंदू

पालकमंत्री श्री. महाजन यांनी आज शहरातील रामकुंड परिसर, रामकालपथ, घाट आदी कामांची पाहणी केली. यावेळी महापौर हिमगौरी आडके- आहेर, कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, सहआयुक्त प्रदीप चौधरी, पंचवटीच्या प्रभाग समिती सभापती श्रीमती रोहिणी पिंगळे, शहर अभियंता संजय अग्रवाल, पुरोहित संघाचे पदाधिकारी, यांच्यासह नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका वाहतूककोंडी फोडण्यासाठी एसटी बसच्या मार्गात बदल; दोन्ही प्रवेशद्वारांचा कायमस्वरूपी वापर

पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले की, 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहणासाठी राष्ट्रपती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आखाड्यांचे साधू-संत, महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत त्र्यंबकेश्वर व नाशिक या दोन्ही ठिकाणी ध्वजारोहणाचा भव्यदिव्य सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यास अजून 40 दिवसांचा कालवधी असला तरी रामकुंड येथे होणारा नवीन घाट, कुंड, सांडपाणी व्यवस्था व इतर अनुषंगिक कामे येत्या 3 आठवड्यांच्या कालावधीत गतीने पूर्ण करावीत. ध्वजारोहण सोहळा कार्यक्रमानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे त्यादृष्टीनेही सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत दोन तोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास

राज्यात दुष्काळसदृश स्थिती असून शासन हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यादृष्टीने पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून येणाऱ्या काळात पंचनामे पूर्ण होताच शेतकऱ्यांना मदत जाहिर केली जाईल. असेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790