Amazon

नाशिक: ब्लॅक फिल्म लावणाऱ्या ९६२ वाहनांवर कारवाई; ७.७० लाखांचा दंड

नाशिक। दि. ३० सप्टेंबर २०२६: वाहनांच्या काचांवर नियमबाह्य काळी फिल्म लावून वाहन चालविणाऱ्यांविरोधात नाशिक शहर वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान ३५ दिवसांत तब्बल ९६२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनचालकांकडून ७ लाख ७० हजार ५०० रुपयांचा ऑनलाइन दंड वसूल करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे १७ व १८ ऑक्टोबर रोजी आयोजन

कारवाईदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून वाहनांच्या काचांवर लावण्यात आलेल्या काळ्या फिल्मही काढून टाकण्यात आल्या. वाहनांच्या काचांवर अशा प्रकारची फिल्म असल्यास वाहनाच्या आतील भागाची दृश्यमानता कमी होते. परिणामी वाहनचालकाला आजूबाजूच्या वाहतुकीचा तसेच रस्त्यावरील परिस्थितीचा योग्य अंदाज घेण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: मंत्रोच्चारांच्या घोषात त्र्यंबकेश्वर येथे विधिवत ध्वजस्तंभ पूजन !

वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने नियमबाह्य ब्लॅक फिल्मचा वापर धोकादायक ठरू शकतो. अपघातांना आळा घालण्यासोबतच वाहनचालक, पादचारी आणि अन्य रस्ते वापरकर्त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790