Amazon

त्र्यंबकेश्वर: कुशावर्त १ ते ३० ऑक्टोबर भाविकांसाठी बंद

नाशिक। दि. ३० सप्टेंबर २०२६: त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध कुशावर्त तीर्थ भाविकांसाठी १ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरदरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर कुंडाच्या संवर्धन, दुरुस्ती, अद्ययावतीकरण आणि सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे ऐन पितृपक्षात त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांना कुशावर्तात स्नान करता येणार नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी होणार आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपतींना निमंत्रित करण्यात येणार असून, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे एकाच वेळी ध्वजारोहण करण्याचे नियोजन आहे.

या सोहळ्याच्या तयारीचा एक भाग म्हणून कुशावर्त तीर्थाच्या विविध कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलिस अधीक्षक तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याच बैठकीत कुशावर्त तीर्थ १ ते ३० ऑक्टोबरपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कामे पूर्ण झाल्यानंतर ३१ ऑक्टोबरपासून कुशावर्त भाविकांसाठी पुन्हा खुले होण्याची शक्यता आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790