नाशिक। दि. १९ जून २०२६: नाशिक शहर मधील विद्युत वाहिनीवर देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने शनिवार २० जून रोजी जेलरोड कक्ष अंतर्गत असलेल्या ३३/११ पंचक उपकेंद्रातून निर्गमित होणाऱ्या ११ केव्ही राहुल नगर व सायट्रिक विद्युत वाहिन्या सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत तर ३३ केव्ही गंगापूर विद्युत वाहिनीचा पुरवठा सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे शनिवार दिनांक २० जून रोजी ३३/११ के.व्ही. उपनगर विद्युत उपकेंद्रात देखभाल व दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे उपनगर विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व विद्युत वाहिनीवरील वीजपुरवठा सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत एक तास बंद राहील.
यामध्ये विद्युत वाहिनीनुसार खालील परिसराचा समावेश असेल:
११ कें.व्ही. राहुलनगर वाहिनी:
राहुलनगर, दामोधर नगर, केरु पाटील नगर, सिद्धाई नगर, मोरे मळा, पवारवाडी, भैरवनाथ नगर, भारत भूषण, वाघेश्वरी, विमलनगर, प्रगतीनगर, ब्रीजनगर व परिसर.
११ केंव्ही सायट्रिक वाहिनी:
एकदंत अपार्टमेंट, द्वारकानगर, एकतानगर, हरीकूलनगर, संभाजीनगर, सद्गुरू नगर, आयोध्यानगर, गुरुअमृतनगर, शनिमंदिर परिसर, सरस्वतीनगर श्रीकृष्ण नगर व परिसर.
३३ केव्ही गंगापूर विद्युत वाहिनी:
कॉलेज रोड, शिर्के मळा, बीवायके कॉलेज, कृषी नगर, सायकल सर्कल परिसर, पारिजात नगर, पी अँड टी कॉलनी, कॅनडा कॉर्नर व परिसर.
उपनगर विद्युत उपकेंद्र: यामध्ये डीजीपी नगर, समता नगर, गांधी नगर, इच्छामनी, नाशिक रोड आणि आर्टिलरी या ११ केव्ही विद्युत वाहिनीवरील भागाचा समावेश आहे.
सदर काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
![]()


