नाशिक। दि. २६ ऑक्टोबर २०२६: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (दि. २६) रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन, संत-महंतांशी संवाद, आदिवासीबहुल भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिधा वाटप, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा आणि शहरातील विकासकामांचा शुभारंभत्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
शिंदे सकाळी ९.३० वाजता त्र्यंबकेश्वर श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेऊन संत-महंतांशी श्री चंद्र लॉन्स, त्र्यंबकेश्वर, येथे संवाद साधणार आहेत. हरसूल येथील महानुभाव दत्त मंदिर, दलपतपूर रोड, येथे दुपारी १२ वाजता आदिवासीबहुल भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिधा वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दुष्काळी परिस्थितीचा आढावा आणि आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
समांतर गंगापूररोडच्या कामाचा आज शुभारंभ:
नाशिक शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नवीन समांतर गंगापूर रोडचा भूमिपूजन सोहळा दुपारी ३ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. कॅनॉल रोड परिसर, तिरुमला हाइट्स, पाईप लाइन रोड, गंगापूर रोड येथे हा कार्यक्रम होणार असून या रस्त्यामुळे गंगापूर रोड परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होणार असल्याची माहिती उपमहापौर विलास शिंदे यानी दिली.
![]()


