Amazon

नाशिकच्या टपाल कार्यालयात 5 नोव्हेंबर रोजी डाक अदालत

नाशिक। दि. २६ ऑक्टोबर २०२६: डाक अदालत, वरीष्ठ डाक अधीक्षक, नाशिक डाक विभाग, मुख्य डाकघरजवळ, त्र्यंबक रोड, नाशिक यांच्या कार्यालयात 5 नोव्हेंबर, 2026 रोजी दुपारी 4 वाजता डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डाकघरचे वरीष्ठ अधीक्षक प्रफुल्ल वाणी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक महानगर प्रदेशात नियोजित विकासासाठी भूखंडधारकांना नगररचना योजनेत सहभागाची संधी

नाशिक विभागातील टपाल सेवेविषयीच्या ज्या तक्रारींचे निवारण 6 आठवड्यांत झालेले नाही, अशा तक्रारींचा डाक अदालतमध्ये विचार केला जाणार आहे. त्यासाठी तक्रार संबंधित कागदपत्रांसह वरीष्ठ डाक अधीक्षक, नाशिक डाक विभाग, नाशिक यांच्या कार्यालयात 2 नोव्हेंबर,2026 पूर्वी पोस्टद्वारे किंवा प्रत्यक्ष पाठवाव्यात. तक्रारी donashik.mh@indiapost.gov.in या ई-मेलद्वारेही पाठविता येतील. ग्राहकांनी डाक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरीष्ठ अधीक्षक श्री. वाणी यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790