सिंहस्थ २०२७ साठी नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये दिशादर्शक व्यवस्थेची पाहणी; आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सहभाग

नाशिक। दि. २३ मे २०२६: नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणासोबत नुकत्याच झालेल्या प्राथमिक बैठकीनंतर आंतरराष्ट्रीय वे-फाइंडिंग तज्ज्ञ मार्क रॉस आणि ग्राफिक्स बियॉन्डचे सहसंस्थापक बारिश दाते यांनी संपूर्ण आठवडाभर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील विविध भागांची पाहणी करत सिंहस्थ २०२७ साठी भाविकांच्या हालचालींचे स्वरूप आणि पायाभूत सुविधांचा अभ्यास केला.

कुंभमेळा प्राधिकरण अधिकारी आणि विविध विभागांच्या प्रतिनिधींसमवेत या पथकाने प्रमुख भाविक मार्ग, घाट परिसर, पार्किंग क्षेत्रे, ट्रान्झिट पॉइंट्स तसेच साधुग्राम परिसराची पाहणी केली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित वैज्ञानिक साईनेज आणि वे-फाइंडिंग प्रणालीच्या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

२००२ मध्ये स्थापन झालेल्या ग्राफिक्स बियॉन्ड या संस्थेने राम मंदिर तीर्थ क्षेत्र, आयआयटी बॉम्बे यांसारख्या प्रकल्पांसह ८५० हून अधिक वे-फाइंडिंग प्रकल्पांवर काम केले आहे. या संस्थेने ऑस्ट्रेलियातील ‘डॉट डॅश’ या डिझाइन संस्थेचे सहसंस्थापक मार्क रॉस यांना या प्रकल्पासाठी जोडले आहे. रॉस यांनी सिडनी, अथेन्स आणि बीजिंग ऑलिम्पिक तसेच पॅरालिम्पिक स्पर्धांसाठी साईनेज आणि नेव्हिगेशन प्रणालीवर काम केले आहे.

मार्क रॉस म्हणाले, “कुंभमेळ्यातील प्रचंड गर्दी लक्षात घेता सर्वसमावेशक आणि सुरक्षित दिशादर्शक प्रणाली तयार करण्यावर भर दिला जात आहे. पोलिस, आरोग्य, पाटबंधारे, एमएसआरटीसी, रेल्वे, एएसआय आणि नाशिक महापालिका अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. २०१५ च्या कुंभमेळ्यातील आराखडे, मार्ग नकाशे आणि नियोजन माहितीचाही अभ्यास करण्यात आला.”

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कोयत्याने हल्ला, तोडफोड करणाऱ्या बेहनवाल टोळीचा केला ''कायद्याचा बालेकिल्ला'' !

“आम्ही या प्रकल्पाकडे नव्याने पाहत असलो तरी मागील अनुभवांमधून शिकत आहोत. पुढील टप्प्यात विश्लेषण अहवाल आणि डायग्रामॅटिक स्टडीजद्वारे भाविकांच्या प्रवासाचा अभ्यास आणि प्रत्यक्ष अडचणींचे मॅपिंग करण्यात येणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

बारिश दाते म्हणाले, “भाविकांसाठी दिशादर्शक प्रणाली ही ‘सायलेंट गाईड’सारखी काम करावी, असा आमचा प्रयत्न आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची हालचाल अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यावर भर असेल.”

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “सिंहस्थ २०२७ दरम्यान गर्दी व्यवस्थापन, आपत्कालीन प्रतिसाद आणि भाविकांच्या सोयीसाठी वैज्ञानिक वे-फाइंडिंग प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.”

🔎 हे वाचलं का?:  नाशिकला मुसळधार पावसाचा तडाखा; गोदावरीला हंगामातील पहिला मोठा पूर, जनजीवन विस्कळीत

👉 नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये संयुक्त पाहणी
👉 वैज्ञानिक साईनेज आणि वे-फाइंडिंग प्रणालीवर भर
👉 ऑलिम्पिक साईनेज तज्ज्ञ मार्क रॉस यांचा सहभाग
👉 भाविक मार्ग, घाट, पार्किंग आणि साधुग्रामचा अभ्यास
👉 २०१५ कुंभमेळ्यातील आराखडे आणि मार्ग नकाशांचा आढावा
👉 पोलिस, आरोग्य, पाटबंधारे, एमएसआरटीसी, रेल्वे, एएसआय आणि महापालिकेसोबत बैठक
👉 पुढील टप्प्यात भाविक प्रवासाचे मॅपिंग आणि डायग्रामॅटिक स्टडीज
👉 लाखो भाविकांसाठी सुरक्षित, सुलभ आणि सर्वसमावेशक दिशादर्शक व्यवस्था उभारण्याचे उद्दिष्ट

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790