कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

नाशिक, दि. सप्टेंबर २०२६: कुंभनगरी नाशिकमध्ये RED FM 93.5 Nashik यांच्या वतीने ‘गीत रामायण’ या अजरामर सांगीतिक कलाकृतीचे विशेष सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. आज, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

महाकवी ग. दि. माडगूळकर लिखित आणि महान संगीतकार व गायक ‘बाबूजी’ सुधीर फडके यांच्या संगीताने अजरामर झालेल्या ‘गीत रामायण’चा सुरेल आविष्कार नाशिककरांना अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य गायक व सादरकर्ते श्री. संजय जोशी (नांदेड) असून त्यांच्या समवेत सहगायिका सौ. सारिका पांडे सहभागी होणार आहेत. तसेच प्रा. डॉ. जगदीश देशमुख, श्री. चेतन पांडे – तबला, श्री. लक्ष्मीकांत धनोरकर- हार्मोनियम, श्री. पंकज शिरभाते सहवाद्ये, श्री. भगवानराव देशमुख – सहवाद्ये आणि प्रा. श्री. रविंद्र मगर – निवेदक यांचे विशेष योगदान या सादरीकरणात असणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

रामायणातील विविध प्रसंग, भावना, भक्ती, शौर्य आणि संस्कारांना संगीताच्या माध्यमातून सादर करणाऱ्या या अजरामर कलाकृतीचा आनंद नाशिककरांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे. विनामूल्य प्रवेशिका मिळविण्यासाठी 9823153322 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790