नाशिक: शहरातील ‘या’ भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार…

नाशिक। दि. ८ सप्टेंबर २०२६: नाशिक शहरातील अंबड १३२ केव्ही विद्युत उपकेंद्रामधून निघणाऱ्या ३३ केव्ही सिडको-१ या वीज वाहिनीच्या तातडीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामाकरिता, दत्त चौक विद्युत उपकेंद्र मधून निघणाऱ्या सर्व विद्युत वाहिन्यांचा वीज पुरवठा बुधवारी दिनांक ०९ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० ते दुपारी ०२:३० वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

सदर वाहिन्या बंद असल्याकारणाने खालील परिसरातील वीज पुरवठा प्रभावित राहील.
यामध्ये: महाराणा प्रताप चौक, अंबड पोलीस स्टेशन, महाले फार्म, उत्तम नगर, पवन नगर, त्रिमूर्ती चौक, लेखानगर, खांडे मळा, खोडे मळा, महाकाली चौक, शिवशक्ती चौक, दिव्या ॲड लॅब आणि सिडकोचा संपूर्ण भाग.

🔎 हे वाचलं का?:  त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी निघालेल्या १८ वर्षीय युवतीचा बसखाली चिरडून मृत्यू; ठक्कर बाजार स्थानकातील दुर्घटना

देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास किंवा तांत्रिक कारणास्तव वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790