नाशिक। दि. १७ नोव्हेंबर २०२६: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी रिक्त जागांसाठी माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी, पदविका, तांत्रिक तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
प्रवेश अर्जासोबत वडिलांचे उसतोड कामगार प्रमाणपत्र/ओळखपत्र, ओळखपत्र, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, आधारकार्ड प्रत, बोनाफाईड, शैक्षणिक शुल्क भरल्याची पावती, मागील वर्षाचे गुणपत्रक, बँक पासबुकची प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, सन २०२५-२६ चा पालकांचा उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग व अनाथ प्रमाणपत्र (लागू असल्यास), नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आदी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
वसतिगृह पात्र विद्यार्थ्यांना निवास, नाश्ता, दुपारचे जेवण व इतर सोयी-सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी संत भगवानबाबा उसतोड कामगार मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक येथे संपर्क साधावा.
![]()


