Amazon

नाशिक: बेडखाली लपून महिलेवर नजर ठेवली; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक। दि. १६ नोव्हेंबर २०२६ : महिलेच्या घरातील बेडखाली लपून तिच्यावर नजर ठेवणाऱ्या तरुणाविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोका मार्ग परिसरातील खोडेनगर येथे हा धक्कादायक प्रकार घडला. आदिल पटेल असे संशयित तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला सकाळी सव्वानऊच्या सुमारास कामावरून घरी परतली होती. त्यानंतर नेहमीप्रमाणे कपडे बदलण्यासाठी ती बेडरूममध्ये गेली. यावेळी बेडखाली आधीपासूनच लपून बसलेला आदिल पटेल तिच्यावर नजर ठेवत असल्याचे तिच्या निदर्शनास आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला ! किमान तापमान १२.६ अंशांवर

महिलेने अचानक संशयिताला पाहिले, त्यावेळी ती कपडे बदलत होती. आरोपीने तिच्या नकळत घरात प्रवेश करून बेडखाली लपून तिच्यावर नजर ठेवली आणि तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. महिलेच्या निदर्शनास हा प्रकार येताच संशयिताने तेथून पळ काढला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एमएनजीएल अपडेटच्या नावाखाली सायबर फसवणूक; बनावट APK फाइलद्वारे १.४८ लाखांचा गंडा

या घटनेनंतर महिलेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आदिल पटेल याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस हवालदार जाधव पुढील तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790