Amazon

नाशिकमध्ये आज (दि. १७ नोव्हेंबर) रंगणार ‘झिलमीलाते सीतारों की मैफिल

नाशिक। दि. १७ नोव्हेंबर २०२६: संगीतप्रेमींसाठी एक सुरेल संध्याकाळ अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अफलातून म्युझिक लव्हर्स आणि सेन्सेशनल म्युझिकल इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रौप्य महोत्सव (भाग २५) : झिलमीलाते सीतारों की मैफिल’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  कर्मचारी भरतीबाबत सोशल मीडियावर बनावट जाहिरातींचे पेव; महावितरणशी संबंध नाही !

मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता इंदिरा नगर येथील बापू बंगला परिसरातील स्वर्णिमा सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे. या मैफिलीत नाशिकमधील नामवंत गायक कलाकार आपल्या सुमधुर आवाजातून विविध गाण्यांची सुरेल मेजवानी सादर करणार आहेत.

संगीतप्रेमींना जुन्या आणि लोकप्रिय गीतांच्या सुरेल आठवणींमध्ये रमण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. विशेष म्हणजे, कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एमएनजीएल अपडेटच्या नावाखाली सायबर फसवणूक; बनावट APK फाइलद्वारे १.४८ लाखांचा गंडा

आपल्या मित्रपरिवारासह आणि कुटुंबीयांसोबत या संगीत मैफिलीचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहावे, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचा तपशील :

  • कार्यक्रम : रौप्य महोत्सव (भाग २५) – झिलमीलाते सीतारों की मैफिल
  • दिनांक : मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६
  • वेळ : सायंकाळी ६ वाजता
  • स्थळ : स्वर्णिमा सभागृह, बापू बंगला, इंदिरा नगर, नाशिक
  • आयोजक : अफलातून म्युझिक लव्हर्स आणि सेन्सेशनल म्युझिकल इव्हेंट्स

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790