Amazon

नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत माहितीसाठी प्राधिकरणाची संकेतस्थळ आणि सोशल मिडिया हँडल्सचा जाणून घ्या…

नाशिक। दि. १७ नोव्हेंबर २०२६: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे विविध विकासकामे, पायाभूत सुविधांची उभारणी आणि भाविकांसाठी सोयीसुविधांची निर्मिती सुरू आहे. या कामांशी संबंधित माहिती आणि महत्त्वाच्या घडामोडी समाजमाध्यमांवरून प्रसारित होत असताना नागरिक आणि भाविकांनी अधिकृत माहितीसाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळासह अधिकृत सोशल मिडिया हँडल्सचाच आधार घ्यावा, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले होते. https://simhasthamahakumbh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाशी संबंधित माहिती, महत्त्वाच्या घडामोडी आणि अधिकृत घोषणा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, प्राधिकरणाच्या सर्व अधिकृत समाजमाध्यम खात्यांच्या लिंक्सही या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना संकेतस्थळावरूनच प्राधिकरणाच्या विविध डिजिटल माध्यमांपर्यंत पोहोचता येते.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीतील पायाभूत सुविधांची कामे, भाविकांसाठीच्या सोयीसुविधा, प्रशासकीय निर्णय, विविध उपक्रम आणि महत्त्वाच्या घडामोडींची माहिती प्राधिकरणाकडून YouTube, Facebook, X आणि Instagram या माध्यमांतून नियमितपणे प्रसिद्ध केली जाते.

कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “सिंहस्थ कुंभमेळा हा व्यापक लोकसहभाग आणि अनेक यंत्रणांच्या समन्वयातून पार पडणारा महत्त्वाचा सोहळा आहे. या अनुषंगाने नागरिक आणि भाविकांपर्यंत अचूक व अद्ययावत माहिती पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या तयारीसह विविध व्यवस्था आणि महत्त्वाच्या घोषणांची माहिती मिळविण्यासाठी नागरिकांनी प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळाला आणि सोशल मिडिया हँडल्सला भेट द्यावी. समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या माहितीची खातरजमा अधिकृत माध्यमांतून करूनच ती पुढे प्रसारित करावी.”

सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची अधिकृत डिजिटल माध्यमे:
संकेतस्थळ : https://simhasthamahakumbh.maharashtra.gov.in
YouTube : @official_ntkma
Facebook : @ntkmaofficial

X (Twitter) :

Instagram :

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790