नाशिक। दि. १७ नोव्हेंबर २०२६: राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२६-२७ च्या प्राथमिक फेरीचे आयोजन 8 डिसेंबर,2026 पर्यंत सायंकाळी 7 वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृह, नाशिक येथे करण्यात आले आहे. नागरिकांनी या स्पर्धेतील विविध नाट्यप्रयोगांना उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे
या स्पर्धेत 17 नोव्हेंबर रोजी ‘पिवळी भिंत’, 18 नोव्हेंबर रोजी ‘दाह’, दि. 19 नोव्हेंबर रोजी ‘केअरटेकर’, 20 नोव्हेंबर रोजी ‘खेळ’, 21 नोव्हेंबर रोजी ‘शेवंता जित्ती हाय’, 22 नोव्हेंबर रोजी ‘मृत्यू आधीच आला होता’, 23 नोव्हेंबर रोजी ‘सलवा जुडूम’, 24 नोव्हेंबर रोजी ‘एक धुरंदर तीन बिलंदर’, 25 नाव्हेंबर रोजी ‘कातळवेल’, 26 नोव्हेंबर रोजी ‘आमचा काळ मस्त होता’,27 नोव्हेंबर रोजी ‘कळी बंद पाऊस, 28 नोव्हेंबर रोजी ‘एक्सपायरी डेट’, 29 नोव्हेंबर रोजी ‘श्याम तुझी आऊस इली रे’… तसेच…
30 नोव्हेंबर रोजी ‘द रेड पेन ड्राईव्ह’, 1 डिसेंबर रोजी ‘बाग बेंच आणि बरेच काही’, 2 डिसेंबर रोजी ‘नेटवर्क प्रॉब्लेम’, 3 डिसेंबर रोजी ‘मेले कोण’, 4 डिसेंबर रोजी ‘हमिदाबाईची कोठी’, 5 डिसेंबर रोजी ‘रघुनाट्य @ ब्लॉगपोस्ट’, 6 डिसेंबर रोजी ‘नथिंग टू से’, 7 डिसेंबर रोजी ‘आता कुठे धावे मन’ आणि 8 डिसेंबर रोजी ‘लेडीज सायकल’ या नाटकांचे सादरीकरण होणार आहे. या विविध नाटकांचे सादरीकरण पाहण्यासाठी तिकीट दर रुपये १५ व रुपये १० याप्रमाणे असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले आहे.
![]()


