Amazon

नाशिक: वन्यजीव सप्ताहानिमित्त नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात निसर्ग निर्वाचन केंद्र व तिकीट घराचे उद्घाटन

नाशिक। दि. ६ ऑक्टोबर २०२६: वन्यजीव सप्ताह (२ ते ८ ऑक्टोबर) निमित्त नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील खाणगाव थडी कॅम्प येथे निसर्ग निर्वाचन केंद्र व तिकीट घराचे उद्घाटन वन्यजीव विभाग, नाशिकचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (BNHS) वतीने ग्रीन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत निसर्ग संरक्षक व निसर्ग मार्गदर्शक (नेचर गाइड) प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींना श्री. भवर तसेच नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना वन विभागाच्या वतीने प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: "कोणताही पात्र मतदार यादीत समावेशनापासून वंचित राहणार नाही याची मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी"

निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून अभयारण्यातील जैवविविधतेची ओळख:
नागरिक व पर्यटकांना करून देतानाच स्थानिक युवकांना निसर्ग संवर्धनाच्या कार्यात सहभागी करून घेणे, त्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. अभयारण्याच्या संरक्षणासोबतच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रशिक्षित निसर्ग मार्गदर्शकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: त्र्यंबकेश्वरला १२ ऑक्टोबरपर्यंत ‘व्हीआयपी’ दर्शन बंद

या कार्यक्रमास सहायक वनसंरक्षक हेमंत उबाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. चौधरी, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे प्रोग्राम ऑफिसर नंदकिशोर दुधे, इन्फॉर्मेशन ऑफिसर श्रीमती नताशा गिरकर, वनपाल राजेंद्र दोंड, वनरक्षक गोरख पाटील, कैलास सद्गिर यांच्यासह अभयारण्याचे संरक्षण पथकातील गंगाधर आघाव, सुनील जाधव, एकनाथ साळवे, संजीव गायकवाड तसेच निसर्ग मार्गदर्शक अमोल दराडे, विकास गारे, रोहित मोगल, पंकज चव्हाण, रोशन पोटे, अजित कुटे, साहिल झोमन आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790