Amazon

नाशिककरांसाठी आज (दि. ६) रंगणार सुरेल ‘भावतरंग’; भावगीतांची अविस्मरणीय मैफल

नाशिक। दि. ६ ऑक्टोबर २०२६: भावना, शब्द, कवित्व, सूर आणि संगीत यांचा सुरेल मिलाफ असलेल्या भावगीतांचा आनंद नाशिककरांना आज अनुभवता येणार आहे. सेंसेशनल म्युझिकल इव्हेंट्स यांच्या वतीने ‘भावतरंग’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भावगीतांमधून मनातील विविध भावना स्वरबद्ध होत असतात. अनेकांच्या आयुष्यातील सुंदर आठवणींशी जोडलेली अशी निवडक भावगीते या कार्यक्रमातून सादर केली जाणार आहेत. यासाठी उत्तम गायकांची टीम सहभागी होणार असून, त्यांच्या सादरीकरणासोबत समीर ओतूरकर यांचे अभ्यासपूर्ण आणि रंगतदार निवेदन हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील ‘या’ भागांत मंगळवारी (दि. 6 ऑक्टोबर) वीजपुरवठा बंद राहणार…

संगीतप्रेमींसाठी भावभावनांनी नटलेला हा सुरेल कार्यक्रम आज, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे ठिकाण स्वार्णिमा सभागृह, बापू बंगल्या समोर, इंदिरा नगर, नाशिक असे आहे. नाशिककर रसिकांनी या संगीत मैफलीचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790