Amazon

नाशिक: गॅसलाइन बिल अपडेटच्या बहाण्याने ऑनलाइन फसवणूक; नाशिकमध्ये ४.०७ लाखांचा गंडा

नाशिक। दि. ५ ऑगस्ट २०२६ : गॅसलाइन बिल अद्ययावत करण्याच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार नाशिकमध्ये वाढत असून, कोणार्कनगर परिसरातील दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल ४ लाख ७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: रामकुंड परिसरातील कामे ३ आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला अनोळखी क्रमांकावरून फोन करून गॅसलाइन बिल अपडेट करण्यासाठी लिंक पाठविल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर संबंधितांनी सांगितलेल्या सूचनांनुसार अॅप डाऊनलोड करताच त्यांच्या बँक खात्यातून ९४ हजार रुपये ऑनलाइन वळते करण्यात आले. अशाच पद्धतीने आणखी एका ज्येष्ठ नागरिकालाही गंडा घालण्यात आला असून, दोन्ही घटनांमध्ये एकूण ४.०७ लाख रुपयांची फसवणूक झाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनालाही प्राधान्य द्यावे- पालकमंत्री गिरीश महाजन

सायबर गुन्हेगारांकडून गॅस कंपनीच्या नावाचा वापर करून नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जानेवारी २०२५ ते ४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अशा प्रकारचे २८ गुन्हे विविध पोलिस ठाण्यांत नोंदविण्यात आले असून, त्यामध्ये नागरिकांची ८८.४८ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. गंगापूर, मुंबई नाका, सरकारवाडा आणि भद्रकाली पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या गुन्ह्यांची नोंद आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रशासनात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा, कामाचे प्रभावी दस्तऐवजीकरण करा : आयुष प्रसाद

दरम्यान, घरपट्टी व पाणीपट्टीचा इंडेक्स क्रमांक अद्ययावत करण्याच्या नावाने नागरिकांना पाठविले जाणारे संदेशही बनावट असल्याचा इशारा नाशिक महानगरपालिकेने दिला आहे. पालिकेकडून अशा प्रकारचे कोणतेही संदेश पाठविले जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, या प्रकरणी सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790