Amazon

नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 10 ऑगस्ट रोजी आयोजन

नाशिक। दि. ५ ऑगस्ट २०२६: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक व युवाशक्ती फाउंडेशन, नाशिक आणि गुरूकुल पॉलिटेक्नीक, नांदगाव यांच्या संयुक्त विद्यामने सोमवार 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाही 10.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदगाव, जि.नाशिक या ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप; २५ हजारांचा दंड

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात सदर मेळाव्यात युवशक्ती स्किल इंडिया प्रा. लि.र‍िक्तपदे-200, महिंद्रा अँड महिंद्रा, नाशिक रिक्तपदे-200, जे के.मैनी प्रेसिजन टेक्नोलॉजी लि.रिक्तपदे-100, एमएसएल ड्राईव्ह आईन सिस्टम‍ लि.रिक्तपदे-50, बजाज सन्स लिमिटेड रिक्तपदे -50, तापरिया टुल्स लि.रिक्तपदे-50, एमडी इंडस्ट्रीज & एमडी कंपोनेन्टस. रिक्तपदे-100, ब्लू स्टार लिमिटेड, पालघर रितपदे-200, आयएसी इंटरनॅशनल ऑटो इं. प्रा.लि. रिक्तपदे-50, एस्टोमो इंडिया लि. नाशिक रिक्तपदे-100, गॅबरिल इंडिया लि. नाशिक रिक्तपदे-50, मॉस्डोरुर इंडिया प्रा.लि. नाशिक रिक्तपदे-50, वैष्णवी ऑओ (पी) लिमिटेड नाशिक, रिक्तपदे-20, अशा एकूण 15 पेक्षा जास्त आस्थापना /कंपन्या व त्यांचे प्रतिनिधी जिल्ह्यातील युवक/ युवतींना एकूण 1220 पेक्षा जास्त विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओढासह देवळाली रेल्वे स्थानकांची पाहणी

नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्री. रिसे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790