Amazon

नाशिक: ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमाचे आज (दि. २२) आयोजन; विनामूल्य प्रवेश

नाशिक। दि. २२ सप्टेंबर २०२६: गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने नाशिक जिल्ह्यात गणेशोत्सवानिमित्त ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता कालिदास कलामंदिर, नाशिक येथे विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओढासह देवळाली रेल्वे स्थानकांची पाहणी

या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन नागरिकांना घडणार आहे. या कार्यक्रमात गायन, वादन, नृत्य व संगीत यांचा सुरेल संगम अनुभवता येणार असून जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन या कार्यक्रमातून घडणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकरोड बसस्थानक तीन महिने बंद; सिटीलिंकच्या बसमार्गांत महत्वाचे बदल

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला व संस्कृतीचे विविध रंग सादर करण्यात येतील. यामध्ये गण, गवळण, लावणी, कोळीगीत तसेच शेतकरी गीतांवर आधारित विविध लोकनृत्यांचा समावेश आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या लोककलेचा आणि सांस्कृतिक परंपरांचा समृद्ध वारसा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: रामकुंड परिसरातील कामे ३ आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश

हा कार्यक्रम विनामूल्य आहे. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या सांस्कृतिक कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790