Amazon

पुढील दोन आठवडे मान्सून सक्रिय; देशभरात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई। दि. ५ ऑगस्ट २०२६ : देशभरात पुढील दोन आठवडे मान्सूनची सक्रियता कायम राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात विकसित होत असलेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील बहुतांश भागात समाधानकारक ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: रामकुंड परिसरातील कामे ३ आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश

ग्लोबल वेदर मॉडेल्स, उपग्रह चित्रे आणि हवामानशास्त्रज्ञांच्या ताज्या विश्लेषणानुसार, सध्या ‘इंडियन ओशन डायपोल’ (IOD) ही हवामान प्रणाली पूर्ण क्षमतेने विकसित झालेली नसली, तरी आगामी काळात तिचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.

यंदाच्या मान्सून हंगामात देशातील सुमारे ६६ टक्के भागात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला असून, जवळपास ३० टक्के क्षेत्रात अद्यापही पावसाची कमतरता जाणवत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप; २५ हजारांचा दंड

तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत ‘एल निनो’चा प्रभाव वाढल्यास ‘पॉझिटिव्ह आयओडी’ विकसित होण्याची शक्यता आहे. अशी स्थिती निर्माण झाल्यास भारतीय मान्सूनला अधिक पोषक वातावरण मिळू शकते आणि अनेक भागांतील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790