नाशिक: अंबड पोलिसांकडून चेन स्नॅचिंगचे दोन गुन्हे उघड; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक। दि. ७ मे २०२६: अंबड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चेन स्नॅचिंगच्या दोन घटनांची यशस्वी उकल करत दोन आरोपींकडून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मार्च २०२६ रोजी उत्तमनगर, सिडको परिसरात शैलेजा पवार या रात्री फेरफटका मारत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. तसेच १६ मार्च २०२६ रोजी स्वामी विवेकानंदनगर येथे प्रभावती आझे यांच्या गळ्यातील सुमारे ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी ओरबाडून नेले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी आरोपीला आजन्म कारावास

या दोन्ही प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वी अटक केलेले आरोपी आशितोष योगेश भादेकर (वय २५) आणि भूषण अनिल शिरसाठ (वय २८) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्यांनी दोन्ही चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून एकूण १४ ग्रॅम सोन्याचे दागिने असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790