नाशिक। दि. ८ सप्टेंबर २०२६: क्रीडा व युवक सेवा विभागाच्या वतीने टेबल टेनिस या क्रीडा प्रकारासाठी पात्र खेळाडूंची निवड चाचणी 9 सप्टेंबर, 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या निवड प्रक्रियेत ११ वर्षांखालील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे. त्यानुषंगाने पात्र खेळाडूंनी निवड चाचणी टेबल टेनिससाठी पात्रता कागदपत्रांसह विभागीय क्रीडा संकुल, सर्व्हे नं. १११, हिरावाडी रोड, पंचवटी, नाशिक-४२२००३ येथील इनडोअर हॉलमध्ये ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा विभागाच्या उपसंचालक स्नेहल साळुंखे यांनी केले आहे.
राज्यातील क्रिडा संस्कृतीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी शासनाने ऑलिंपिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या 12 क्रीडा प्रकारांसाठी मिशन लक्ष्यवेध ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत नाशिक जिल्हयासाठी हाय परफॉर्मन्स सेंटर देण्यात आले आहे. यातंर्गत टेबल टेनिस हा प्रकार कार्यान्वित करण्यात येणार आहे. या खेळांसाठी 20 खेळाडूंची निवड निकषाच्या आधारे होईल.
तसेच राज्यस्तरीय/राष्ट्रीय स्तरावरील (टॉप ४) व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभाग प्राप्त खेळाडूंना प्राधान्य देण्यात येणार आहे. निवड प्रक्रियेत क्रीडा कौशल्यासोबत शारीरिक तंदुरुस्ती तपासणीचाही विचार केला जाणार आहे. शासकीय मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून दिलेले वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
निवड चाचणीसाठी खेळाडूंनी जन्म दाखला, शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील तीन वर्षांचे क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पारपत्र साईजचे छायाचित्र, शाळा विद्यार्थ्यांचे बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच पालकांचे संमतीपत्र आदी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. खेळाडू महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे निवड झालेल्या खेळाडूंच्या निवास, भोजन, सप्लीमेंट्स, प्रशिक्षण तसेच इतर आवश्यक खर्च संबंधित योजनेतून करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गौतम अहुजा (मो. 9810012194) व जय मोडक (मो. ९५२७418361) यांच्याशी संपर्क साधावा.
![]()


