नाशिक शहरातील ‘या’ भागांत शुक्रवारी (दि. ८) वीजपुरवठा बंद राहणार

नाशिक। दि. ७ मे २०२६: महावितरणच्या पंचवटी उपविभाग अंतर्गत असलेल्या तपोवन विद्युत उपकेंद्रावरील ११ के.व्ही. साधुग्राम विद्युत वाहिनीवर यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी शुक्रवारी दिनांक ०८ मे रोजी सकाळी ८:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत वीजपुरवठा टप्प्या टप्प्याने बंद राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कुंभमेळ्याच्या माध्यमातून लहान मोठ्या उद्योगांना चालना मिळणार-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

यामध्ये महादेव नगर, रामटेकडी , कपालेश्वर नगर, दुर्गा नगर , के के वाघ कॉलेज एरिया , विडी कामगार (दिगंबर हाउसिंग) , अमृतधाम सोसायटी व परिसर यांचा समावेश आहे. ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790