नाशिक: कमाल तापमानाचा पारा पुन्हा ३८ अंशांवर; उकाड्याची तीव्रता कायम

नाशिक, दि. १७ मे २०२६ : गेल्या दोन दिवसांत काहीशी दिलासा देणारी घट झाल्यानंतर शहरातील कमाल तापमानाने पुन्हा वाढ घेतली आहे. शनिवारी (दि. १६) शहराचे कमाल तापमान ३८.१ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले. त्यामुळे दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता पुन्हा वाढल्याची जाणीव नागरिकांना झाली.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

दरम्यान, किमान तापमानातही विशेष घट झालेली नसून ते २३.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. परिणामी, दिवसभर उष्णतेसोबत रात्रीच्या वेळीसुद्धा उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

मागील आठवड्यात नाशिककरांनी तीव्र उष्णतेचा सामना केला होता. सलग चार दिवस शहरातील तापमान ४० अंशांच्या पुढे कायम राहिले होते. काही ठिकाणी पारा तब्बल ४२ अंशांपर्यंत पोहोचल्याची नोंद झाली होती. या पार्श्वभूमीवर कुलाबा वेधशाळेकडून नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

गेल्या तीन दिवसांपासून वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे तापमानात काहीशी घट झाली होती. मात्र शनिवारी पुन्हा तापमान वाढल्याने उष्णतेचा प्रभाव कायम असल्याचे दिसून आले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस शहर व परिसरात वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790