नाशिक: जलवाहिनी फुटली; नाशिक शहरातील ‘या’ भागांत आज (दि. २६) पाणीपुरवठा बंद राहणार

नाशिक। दि. २६ मे २०२६: कृषीनगर सिद्धार्थनगर झोपडपट्टी परिसरात बारा बंगल्यापर्यंत नेण्यात येणारी निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी ९०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी सोमवारी (दि. २५) सायंकाळी ६:३० वाजता फुटली. पाईपलाईन टाकण्याच्याच कामादरम्यान पोकलॅण्डचा धक्का लागून येथील आधीची पाईपलाईन फुटली. त्यामुळे पालिकेने तातडीने काम हाती घेतल्याने मंगळवारी (दि. २६) पंचवटी आणि नाशिक पूर्व विभागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच, बुधवारी (दि. २७) सकाळचा पाणीपुरवठाही कमी दाबाने होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर धरण ९७ टक्के भरले; शहरातील शनिवारची पाणीकपात रद्द

पाईपलाईन फुटल्यावर पाणीपुरवठा विभागाने तातडीने मुख्य जलवाहीनीचा पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यामुळे मंगळवारी (दि.२६) पंचवटीसह पूर्व विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि काटकसरीने वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी (पाणीपुरवठा) विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अडेसरा यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकला मुसळधार पावसाचा तडाखा; गोदावरीला हंगामातील पहिला मोठा पूर, जनजीवन विस्कळीत

पंचवटी विभागः
प्रभाग क्रमांक १:
रामेश्वर नगर, निसर्गनगर व आजूबाजूचा परिसर.

प्रभाग क्र. २: संपूर्ण धात्रक फाटा, निशांत व्हिलेज, महालक्ष्मीनगर, शरयू पार्क, आडगाव-म्हसरुळ लिंकरोड, मेडिकल फाटा, आडगाव गावठाण, आडगाव मळे परिसर, कोणार्कनगर, नांदूर जत्रारोड, समर्थनगर, निलगिरीबाग, हनुमाननगर, नांदूरनाका, संभाजीनगर आणि नांदूर मानूर परिसर.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

विभाग क्र. ३: लुंगे मंगल कार्यालय परिसर, आडगाव नाका, चव्हाण मळा, गणेशवाडी, जनार्दननगर, विजयनगर, साईनगर, मानेनगर, कळसकरनगर, अमृतधाम, गोपाळनगर, सरस्वतीनगर, तपोवन आणि लगतचा परिसर.

नाशिक पूर्व विभाग:
प्रभाग क्र. १५: काठे गल्ली, माणेकशानगर, शंकरनगर, टाकळी रोड, द्वारका परिसर, गोडेबाबानगर, समर्थनगर, मारुती वेफर्स, तिग्रानिया रोड, प्रज्ञा सोसायटी कॉलनी आणि आजूबाजूचा परिसर.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790