नाशिक जिल्ह्यात मतदार याद्यांचे होणार ‘विशेष सखोल पुनर्निरीक्षण’

नाशिक। दि. २६ मे २०२६: भारतीय संविधानातील कलम 324 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून भारत निवडणूक आयोगाने 24 जून 2025 रोजी देशभरातील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण करण्याचे आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील 51 लाख 28 हजार मतदारांच्या नोंदीची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असून ही प्रकिया जून ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

मागील अनेक वर्षात राज्यात केवळ संक्षिप्त पुनर्निरीक्षण मोहिमा राबविण्यात आलेल्या आहेत. वाढते शहरीकरण, स्थलांतर तसेच मतदार याद्यांमधील दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे किंवा चुकीच्या नोंदी यामुळे मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एस.टी. बसस्थानक परिसरात २०० मीटर 'नो पार्किंग झोन'ची प्रभावी अंमलबजावणी

जिल्ह्यात राबविण्यात येणारी मोहिम व कालावधी
👉 मतदारांच्या घरी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी भेट देवून गणना अर्ज वाटप करणे व भरलेले अर्ज परत घेणे- 30 जून ते 29 जुलै 2026
👉 प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी- 5 ऑगस्ट 2026
👉 प्रारूप यादीवर दावे व हरकती नोंदविणे- 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026
👉 दावे व हरकती निकाली काढणे- 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत
👉 अंतिम मतदार यादींची प्रसिद्धी – 7 ऑक्टोबर 2026

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील ‘या’ महत्वाच्या भागांत गुरुवारी (दि. ११ जून) वीजपुरवठा बंद राहणार…

या मोहिमेसाठी जिल्ह्यातील 4 हजार 919 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले असूरन ते 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत घरोघरी भेट देवून पूर्ण भरलेले गणना पत्रक मतदारांना वितरीत करतील. भरलेले अर्ज पुन्हा संकलित करतील. या प्रपत्रात मतदाराची सध्याची माहिती तसेच उपलब्ध असल्यास 2002-04 मधील विशेष पुनरिक्षणातील जुनी नोंद समाविष्ट असेल. मतदारांना आवश्यक असल्यास स्वत:ची माहिती अद्ययावत करण्याची तसेच नवीन छायाचित्र उपलबध्‍ करून देण्याची सुविधा असणार आहे.

मतदारांना स्वतःची अथवा कुटुंबातील सदस्यांची माहिती पडताळून पाहण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर ) सुविधा उपलब्ध आहे. तसेच आवश्यक माहिती व मार्गदर्शनासाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुढील ३ ते ५ दिवसांत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता

घरभेटीदरम्यान संबंधित कुटुंबीय घरी उपलब्ध नसल्यास मतदार केंद्रस्तरीय अधिकारी किमान 3 वेळा भेट देणार आहेत. तरीही संपर्क होऊ न शकल्यास गणना प्रपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध राहणार असून, त्याबाबतची सूचना संबंधित मतदारांना देण्यात येणार आहे.

मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह करण्यासाठी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांचेही सहकार्य घेतले जाणार आहे. सर्व नागरिकांनी मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून अचूक व त्रुटीमुक्त मतदार यादी तयार करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790