नाशिक: पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची खांदेपालट !

नाशिक। दि. २० जून २०२५: आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वरिष्ठ निरीक्षकांची खांदेपालट केली आहे. पंचवटी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी गजेंद्र पाटील, अंबड पोलिस ठाणे मधुकर कड, नाशिकरोड पोलिस ठाण्यात जितेंद्र सपकाळे यांची तर राकेश चौधरी यांची भद्रकाली पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण वृत्तीचा स्वीकार करावा- पोलिस महासंचालक सदानंद दाते

बदली झालेले अधिकारी (कंसात कोठून कुठे) मधुकर कड (पंचवटी-अंबड), गजेंद्र पाटील (भद्रकाली-पंचवटी), राकेश चौधरी (अंबड-भद्रकाली), जितेंद्र सपकळे (उपनगर-नाशिकरोड), जयंत शिरसाठ (देवळाली कॅम्प-उपनगर), मनोहर कारंडे (चुंचाळे पोलिस चौकी-अंबड दुय्यम निरीक्षक), विश्वास पाटील (सातपूर-चुंचाळे पोलिस चौकी), संजय पिसे (नियंत्रण कक्ष-आडगाव पोलिस ठाणे), सचिन खैरनार (आडगाव-अंबड दुय्यम), श्रीनिवास देशमुख (भद्रकाली-देवळाली कॅम्प प्रभारी), अशोक गिरी (नाशिकरोड-सरकारवाडा दुय्यम निरीक्षक), राकेश हांडे यांना पुढील आदेश होईपर्यंत नियुक्तीच्या प्रतिक्षेत नियंत्रण कक्ष येथे ठेवण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तुमच्या दुकानात बालकामगार काम करतोय? होऊ शकते कठोर कारवाई !

बदली प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा पोलिस दलात सुरू असून आगामी काळात मनपा निवडणूक काळात गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान प्रभारी अधिकाऱ्यांवर असणार आहे. दरम्यान, भद्रकाली, पंचवटी, नाशिकरोड या पोलिस ठाण्यांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये मोक्याच्या जागा मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा बघण्यास मिळत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790