उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष धोकादायक; नियमित रक्तदाब तपासणीची गरज

नाशिक। दि. १७ मे २०२६: “Controlling Hypertension Together: Check Your Blood Pressure Regularly, Defeat the Silent Killer” या यंदाच्या जागतिक उच्च रक्तदाब दिनाच्या घोषवाक्यानिमित्त अपोलो हॉस्पिटल्स नाशिक येथील हृदयरोग तज्ज्ञांनी नागरिकांना नियमित रक्तदाब तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे, वाढता ताणतणाव, अनियमित आहार, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, उच्च रक्तदाबाची लक्षणे अनेकदा सुरुवातीला जाणवत नसल्याने त्याला “Silent Killer” असे संबोधले जाते. अनेक वेळा रुग्णांना कोणतीही स्पष्ट लक्षणे जाणवत नाहीत आणि अचानक गंभीर हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता निर्माण होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

अपोलो हॉस्पिटल नाशिक येथील हृदयरोग तज्ज्ञांनी सांगितले की, नियमित BP तपासणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम, तणावमुक्त जीवनशैली आणि वेळेवर उपचार यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे शक्य आहे.

याबाबत बोलताना डॉ. अभयसिंह वालिया म्हणाले, “आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे तरुणांमध्येही High BP चे प्रमाण वाढताना दिसत आहे. वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

डॉ. अझर सय्यद यांनी सांगितले, “उच्च रक्तदाब वेळेवर नियंत्रणात न ठेवल्यास हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि किडनी विकार सारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे BP कडे दुर्लक्ष करू नये.”

तर डॉ. भूषण टिळे यांनी संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग, ध्यान आणि पुरेशी झोप यांचे महत्त्व अधोरेखित केले. “वेळेवर निदान आणि योग्य उपचारांमुळे भविष्यातील गंभीर धोके टाळता येऊ शकतात,” असे त्यांनी नमूद केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहून नियमित रक्तदाब तपासणी करावी, तसेच निरोगी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन अपोलो हॉस्पिटल नाशिक तर्फे करण्यात आले आहे.

“अपोलो दिल की बात… हृदयाच्या आरोग्यासाठी सदैव साथ” या संदेशाद्वारे नागरिकांना हृदयाच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आजच BP तपासा… कारण उच्च रक्तदाब अनेकदा कोणतीही लक्षणे न देता शरीराला हानी पोहोचवतो. निरोगी हृदयासाठी नियमित तपासणी अत्यंत गरजेची आहे.”
— डॉ. निर्मल कोलते

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790