नाशिक: खुनाचा प्रयत्न व दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन फरार संशयित अटकेत

नाशिक, दि. १८ मे २०२६: खुनाचा प्रयत्न आणि दरोड्याच्या तयारीसारख्या दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या दोन संशयितांना गुन्हे शाखेच्या अंबड युनिट-३च्या पथकाने अटक केली आहे. मोबिन तनवीर कादरी आणि शुभम दादाराव खरात अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

गुन्हे शाखेतील अधिकारी भूषण सोनवणे आणि चारूदत्त निकम यांना संशयित पोतदार स्कूल, पाथर्डी फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

पोलीस चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी मध्यरात्री माया सोनार यांचा मुलगा सागर सोनार याच्याशी झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून संशयितांनी त्यांच्या साथीदारांसह शिवीगाळ करत कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात सागर सोनार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

त्यानंतर २३ मार्च रोजी एकदंतनगर, फडोळ मळा परिसरात हेच संशयित आणि त्यांचे साथीदार दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून पोलीस कारवाई करण्यात आली होती. मात्र, दोन्ही गुन्हे घडल्यानंतर संबंधित संशयित फरार झाले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790