नाशिक: कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील ४ संशयितांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी; निदा खान फरारच !

नाशिक। दि. ६ मे २०२६: कथित ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील चार संशयितांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केल्यानंतर न्यायालयाने ती मंजूर केली. त्यानंतर संशयितांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल बलात्कार, विनयभंग आणि धर्मांतराशी संबंधित गुन्ह्यात तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसैन शौकत कुरेशी आणि रझा रफिक मेमन या संशयितांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी न्यायालयाने त्यांना टप्प्याटप्प्याने पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीत चौकशीदरम्यान काही महत्त्वपूर्ण माहिती समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीला धक्का; अपक्ष उमेदवार गोकुळ गितेंचा विजय

तपासादरम्यान पोलिसांनी संशयितांकडून विविध तांत्रिक पुरावे जप्त केले असून, पीडित महिलांना आमिष दाखवून धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराज्य स्तरावर पसरले असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यामुळे या प्रकरणाने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना अटक; सहा गुन्ह्यांची उकल, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

दरम्यान, या प्रकरणातील संशयित एचआर हेड अश्विनी चेनानी हिने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून, त्यावर ११ मे रोजी सुनावणी होणार आहे. तसेच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या दानिश शेख, रझा मेमन, शाहरुख कुरेशी आणि तौसिफ अत्तार यांनीही नाशिक रोड न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  'सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे साकार होणार भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा अद्वितीय संगम

या प्रकरणातील प्रमुख दुवा मानली जाणारी निदा खान अद्याप फरार असून, तिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने २ मे रोजी फेटाळला होता. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू ठेवला असून विविध पथके तिच्या मागावर आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790