नाशिक: शासकीय अंधशाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक। दि. ६ मे २०२६: शासकीय अंधशाळा येथे 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता अंध विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरूवात झाली आहे, अशी माहिती नाशिक शासकीय अंधशाळेचे प्रभारी अधीक्षक प्रभाकर घाटे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नऊ हजार रुपयांच्या उसनवारीच्या वादातून युवकाची हत्या; आरोपीला १२ तासांत अटक

शासकीय अंधशाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा वयोगट 6 ते 14 वर्षे असा असून विद्यार्थी फक्त अंध प्रवर्गातील असावा. प्रवेशासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील विद्यार्थ्यांचे अंधत्व प्रमाणित वैद्यकीय दाखला असणे आवश्यक आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनामार्फत निवा़स, भोजन व इतर शैक्षणिक सोयी-सुविधा मोफत पुरविल्या जातात.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीला धक्का; अपक्ष उमेदवार गोकुळ गितेंचा विजय

शाळा प्रवेशासाठी विहित नमुन्यातील अर्ज अधीक्षक, शासकीय अंधशाळा, नाशिक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आवार, नासर्डी पुलाजवळ, नाशिक- पुणे रोड कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 या वेळेत उपलब्ध होणार आहेत. अधिक माहितीसाठी 0253-2237568 या दूरध्वनीवर अथवा अधीक्षक प्रभाकर घाटे भ्रमणध्वनी क्रमांक 9518794893, कलाशिक्षक एस. ए. पाळदे, कनिष्ठ लिपिक भ्रमणध्वनी क्रमांक 9623780725 यावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790