नाशिक: ३२ गोण्यांसह सिमेंटचा ट्रक चोरी करणारे तिघे अटकेत !

नाशिक। दि. १० सप्टेंबर २०२५: देवळाली गाव मालधक्का येथून सिमेंटच्या ३२ गोण्यांसह ट्रक चोरी करणाऱ्या ३ संशयितांना सोमवार बाजार येथून नाशिकरोड पोलिसांनी अटक केली आहे. राजू चंद्रमोरे, सुरज कदम, रोहन गौंड असे या संशयितांची नावे आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

संशयितांकडून ट्रक आणि ३२ गोण्या सिमेंट जप्त केले आहे. अनिल शिरसाठ यांचा एमएच १७ सी ६२४७ ट्रक आणि त्यात ३२ गोण्या सिमेंट असलेला ट्रक मालधक्का येथे उभा असतांना या तिघांनी चारी केला होता. ३ संशयित सिमेंट विक्री करण्याकरीता सोमवार बाजार येथे आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ( नाशिकरोड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४३६/२०२५)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790