नाशिक: सिटीलिंकच्या ‘या’ भागांतील वाहतूक मार्गात तात्पुरता बदल

नाशिक। दि. १० सप्टेंबर २०२६: नाशिकरोड बसस्थानकाच्या जागेच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, या कामासाठी बसस्थानकाची जागा तीन महिन्यांसाठी ठेकेदाराच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (सिटीलिंक) काही बसमार्गांमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. ही नवीन वाहतूक व्यवस्था १० सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

नाशिकरोड रेल्वे स्थानकातून त्र्यंबकेश्वर तसेच दिंडोरीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या बससेवांच्या मार्गात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे.

मात्र, नाशिकरोड रेल्वे स्थानकातून इतर भागांकडे जाणाऱ्या काही बससेवांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. बारदान फाटा, सिम्बायोसिस, अंबड, ओझर गाव, हिंगणवेडा, एकलहरे, म्हाडा, गंगापूर गाव, ओझर एअरफोर्स आणि बोरगड या भागांकडे जाणाऱ्या व तेथून येणाऱ्या बससेवा आता नाशिकरोड रेल्वे स्थानकाऐवजी नाशिकरोड आगारातून चालवण्यात येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

पासधारकांसाठी महत्त्वाची सूचना:
काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्यामुळे नाशिकरोड बसस्थानक परिसरातील सिटीलिंकचे पास केंद्र तात्पुरते बंद करण्यात आले आहे. काम पूर्ण होईपर्यंत विद्यार्थी आणि इतर पासधारकांनी पास काढण्यासाठी नाशिकरोड पास केंद्रावर न जाता तपोवन आगार किंवा सिटीलिंक कार्यालय, गोल्फ क्लब, त्र्यंबकरोड येथे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एसटी बस नियोजनात उद्यापासून (दि. ११) महत्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर...

बससेवेतील तात्पुरत्या बदलांमुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना संबंधित मार्गाची माहिती घेऊन सहकार्य करावे, असे सिटीलिंककडून सांगण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790