नाशिकमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

नाशिक | दि. ९ सप्टेंबर २०२५: शहरात अपघातांच्या घटना वाढत असून गेल्या काही दिवसांत दोन पादचारींचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटनांमध्ये ३० वर्षीय युवक व ६० वर्षीय वृद्धाचा जीव गेला असून पंचवटी व सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

मखमलाबाद रोडवरील अपघात:
मंगळवारी (दि. २) रात्री फडोळ मळा परिसरात पायी जात असताना अमर गणपत निकम (३०, रा. पार्वती एनएक्स बिल्डिंग, वडजाई मातानगर) यांना भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांचे भाऊ सागर निकम यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी हवालदार शेळके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

सातपूर कॉलनीतील अपघात:
रविवारी (दि. ७) रात्री मौले हॉल परिसरात दुचाकीने (एमएच ४१ बीएन ९३९३) दिलेल्या धडकेत अशोक संतू आहेर (६०, रा. बंदाणे गल्ली, सातपूरगाव) हे गंभीर जखमी झाले. समाधान देवरे यांच्या संपर्क कार्यालयासमोर झालेल्या या अपघातानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलगा अमोल आहेर यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसांनी दुचाकी चालक धिरज भगवान जाधव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बटुळे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790