नाशिक (प्रतिनिधी): पत्नीच्या भावाच्या आजारी मुलीला बघण्यासाठी रुग्णालयात जात असताना मामांच्या दुचाकीला सिमेंट मिक्सर या अवजड वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्या मामांचा जागीच मृत्यू झाला.
वडाळारोडवर घडलेल्या या घटनेने परिसरातील संतप्त नागरिकांनी वाहनावर दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला होता.
विनयनगर येथील रहिवासी दादाजी (दगा) रामभाऊ शेवाळे (६२) हे बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास साल्याच्या मुलीला वडाळा येथील रुग्णालयात बघण्यासाठी दुचाकीवरून (एमएच १५ बीयू ७१२७) जात होते.
रहेनुमा शाळे जवळील पेट्रोलपंपावर पेट्रोल टाकण्यासाठी ते वळत असताना त्यांच्यादुचाकीला सिमेंट मिक्सर अवजड वाहन (एमएच ४६ बीएम६०३६) ने धडक दिली. यात शेवाळे हे जागीच ठार झाले.
त्यांचे पश्चात दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. अपघाताची माहिती परिसरात पसरल्यानंतर घटनास्थळावर युवकांनी मोठी गर्दीकेली होती. तसेच, संतप्त जमावाकडून अवजड वाहनाचीतोडफोडदेखील करण्यात आली. मुंबईनाका पोलिस तातडीने घटनास्थळावर पोहोचल्याने तणाव निवळला.
या घटनेनंतर वडाळारोडवरील अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा निर्माण झालाआहे. वडाळा-इंदिरानगर रस्त्यावर रहेनुमानगर, अशोक रोड, विनयनगर, इंदिरानगर, साईनाथनगरसह विविध उपनगरे आहेत. यारस्त्यावर दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. तसेच या रस्त्यावर प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालय असल्यानेदिवसभर शेकडोच्या संख्येने विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू असते. असेअसताना या भागातून मालट्रक, ट्रेलर, कंटेनर, टँकर अशी अवजडवाहने वाहतूक सुरू असते. त्यामुळे या मार्गावरून मार्गक्रमणकरणारे पादचारी व छोटे वाहनधारकांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे
वडाळा रस्त्यावर वर्षभरात १२ अपघात:
द्वारका चौकातून अवजड वाहनांची ये-जा बंद करून पुणे महामार्गाकडून येणारी अवजड वाहने वडाळा, इंदिरानगर, पाथर्डी रस्त्याने वळविण्यात आल्याने या मार्गाचा वापर करणाऱ्या स्थानिक नागरिकांसह परिसरातील व्यापारी व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे वारंवार पुढे येत आहे. मागील वर्षभरात या रस्त्यावर १३ अधिक अपघात झाले आहे.