Amazon

नाशिकला हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी येतांना कारला अपघात; महिलेचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): भरधाव अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याने ४० वर्षीय महिलेचा अपघाती मृत्यू झाला. या अपघातात मृत महिलेचा मुलगाही गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी हिंगोली येथून नाशिककडे येत असतांना हा अपघात बळी मंदिर चौकात झाला. संगिता विलास पारस्कर (४० रा. सावळी ता. औंढानागनाथ, हिंगोली) असे मृत महिलेचे नाव असून, या अपघातात शुभम विलास पारस्कर (१८) हा तरूण जखमी झाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी डॉ. नीलेश जेजुरकर पोलिसांच्या ताब्यात

याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगिता पारस्कर या हृदयविकाराने पीडित असल्याने त्यांच्यावर नाशकात शस्त्रक्रिया केली जाणार होती.

शहरातील लोकमान्य हॉस्पिटल येथील डॉक्टरांशी बोलणे करून पारस्कर व माहेरकडील डुकरे कुटुंबिय संगिता पारस्कर यांना घेवून नाशिकला येत होते. त्यांच्या स्विफ्ट कारमधून पाच जण प्रवास करीत होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका वाहतूककोंडी फोडण्यासाठी एसटी बसच्या मार्गात बदल; दोन्ही प्रवेशद्वारांचा कायमस्वरूपी वापर

सोमवारी (दि.७) मध्यरात्री महामार्गाच्या उड्डाणपूलावरून कार बळी मंदिर चौकात उतरली असतांना हा अपघात झाला. चौका पासून काही अंतरावर कार रस्ता ओलांडत असतांना अज्ञात भरधाव वाहनाने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात पारस्कर मायलेक गंभीर जखमी झाल्याने दोघांना तातडीने आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले होते. त्यातील संगिता पारस्कर यांना डॉ. ऐश्वर्या रविंद्रन यांनी बुधवारी (दि.९) उपचार सुरू असतांना मृत्यू घोषीत केले. याबाबत डॉ. महेश सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक माळवाळ करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790