Amazon

नाशिक: शहरातील ‘या’ भागांत मंगळवारी (दि. 6 ऑक्टोबर) वीजपुरवठा बंद राहणार…

नाशिक। दि. ५ ऑक्टोबर २०२६: मंगळवार दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी नाशिक शहरातील उपनगर विद्युत उपकेंद्रातून निर्गमित होणारी ११ केव्ही गांधीनगर विद्युत वाहिनी सकाळी ०९ ते दुपारी २ पर्यंत तसेच मुक्तिधाम विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ केव्ही देवळाली गांव विद्युत वाहिनी सकाळी ०९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत या दोन्ही विद्युत वाहिन्यांवर देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा बंद राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  मॉन्सूनची माघार वेगाने; महाराष्ट्राच्या निम्म्या भागातून पाऊस परतला

यामध्ये खालील परिसरातील वीज पुरवठा प्रभावित राहील:
यामध्ये गांधीनगर विद्युत वाहिनीवर:

अभिष नगर, पंचशील नगर, दत्त मंदिर, दीप नगर, विद्युत कॉलनी, सहकार कॉलनी, एन. के. नगर, एल. आय. सी. सोसायटी, छोटी जनता परिसर, संजय गांधी नगर, टागोर नगर, विजय ममता थिएटर परिसर, जेके टायर, टाकळी रोड परिसर.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: "कोणताही पात्र मतदार यादीत समावेशनापासून वंचित राहणार नाही याची मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी"

तसेच देवळाली गाव विद्युत वाहिनीवर:
मदिना चौक, कादरी मंजिल, राणी लक्ष्मीबाई रोड, गाडेकर मळा, मथुरा रोड, देवळाली गाव परिसर, सोमवार बाजार, विहितगाव परिसर , बुडकी रोड, शिव समर्थ नगर, वीटभट्टी, पोलीस लाईन, सुंदर नगर, सुराणा चौक, सुवर्णा सोसायटी, हरिओम नगर, माहेश्वरी भवन या परिसराचा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: त्र्यंबकेश्वरला १२ ऑक्टोबरपर्यंत ‘व्हीआयपी’ दर्शन बंद

टप्प्याटप्प्याने या भागातील वीजपुरवठा बंद राहणार असून देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास किंवा तांत्रिक कारणास्तव वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790