नाशिक। दि. २ ऑक्टोबर २०२६: नाशिक शहरातील १३२ केव्ही म्हसरूळ उपकेंद्र अंतर्गत ३३ केव्ही पंपिंग विद्युत वाहिनीवर देखभाल व दुरुस्तीचे काम महापारेषणच्यावतीने तसेच महावितरणकडून ११ केव्ही सहदेव नगर विद्युत वाहिनीवर आणि कॅम्पस विद्युत उपकेंद्र मधील ११ केव्ही सिटी ३ विद्युत वाहिनी देखभाल व दुरुस्तीच्या काम करण्यात येणार असल्याने शनिवार दिनांक ०३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत पर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे.
वीज पुरवठा बंद असल्याने खालील परिसरातील वीज पुरवठा प्रभावित राहील.
यामध्ये सहदेवनगर (गंगापूर रोड) विद्युत वाहिनीवरील: दत्त मंदिर चौक , सुयोजित गार्डन, सहदेव नगर, आयचित नगर,साई चौक, दादाजी कोंडदेव नगर, शांतिनिकेतन कॉलनी, नक्षत्र कॉलनी, पूर्णवाद नगर, भाजी बाजार, प्रसाद सर्कल व परिसर.
तसेच सिटी ३ विद्युत वाहिनी वरील: एबीबी सर्कल, महात्मा नगर, सावरकर नगर, गंगापूर पोलिस स्टेशन परिसर, दामोदर चौक, शंकर नगर, संत कबीर नगर, काळे नगर २ आणि गुरुजी रुग्णालय परिसर याचा समावेश आहे.
देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळे अगोदर पूर्ण झाल्यास किंवा तांत्रिक कारणास्तव वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.
![]()


