Amazon

अपोलो हॉस्पिटल्स नाशिकच्या ‘ट्रेकाथॉन २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक। दि. २९ सप्टेंबर २०२६ : जागतिक हृदय दिनानिमित्त अपोलो हॉस्पिटल्स, नाशिक यांच्या वतीने रविवारी, २७ सप्टेंबर रोजी ‘अपोलो ट्रेकाथॉन २०२६’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. अंजनेरी हिल्सच्या निसर्गरम्य आणि आध्यात्मिक वातावरणात आयोजित या उपक्रमाला २०० हून अधिक नामांकित डॉक्टर तसेच १०० हून अधिक आरोग्यप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

हृदयाचे आरोग्य, नियमित व्यायाम, सक्रिय जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या ट्रेकाथॉनचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी डॉक्टर आणि आरोग्यप्रेमींनी अंजनेरीच्या डोंगररांगांमध्ये ट्रेकिंग करत शारीरिक तंदुरुस्तीचा अनुभव घेतानाच निसर्ग आणि आध्यात्मिक वातावरणाचा आनंद घेतला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकरोड, मनमाडसह मुंबई-पुण्याहून दिवाळीनिमित्त ४१८ विशेष रेल्वेगाड्या

या उपक्रमाला अपोलो हॉस्पिटल्सचे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. दिप्तेंदू पांडा यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच हृदयरोग तद्न्य डॉ. मयूर अहिरे, डॉ. भूषण टिळे, डॉ. अभयसिंह वालिया व डॉ. निलेश पुरकर, कन्सल्टंट कार्डियाक सर्जन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

ट्रेकाथॉनच्या माध्यमातून सहभागींच्या शारीरिक क्षमतेची आणि सहनशक्तीची चाचणी झाली आव्हानात्मक चढ-उतारांमधून, विविध पायऱ्या आणि उंचवट्यांवरून सहभागींच्या सहनशक्तीची आणि फिटनेसची कसोटी लागली. मात्र, प्रत्येक टप्प्यावर सहभागी एकमेकांना प्रोत्साहन देत, उत्साह वाढवत पुढे जात राहिले, त्याचबरोबर अंजनेरीच्या निसर्गरम्य परिसरातील दैवी आणि आध्यात्मिक अनुभूतीने या उपक्रमाला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले.

🔎 हे वाचलं का?:  सप्तश्रृंगी गड ते नांदुरी रस्ता १ ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद

यावेळी शिखर सर करणाऱ्यांत सर्वांत लहान ७ वर्षांचा देवांश वाघ व ७०+ वर्षांचे ज्येष्ठ डॉक्टर डॉ. प्रकाश पारीख व डॉ बाळासाहेब बच्छाव विशेष प्रेरणादायी ठरले संपूर्ण मार्गात अनुभवी गिर्यारोहकांच्या टीमने सर्वांना अंजनेरी पर्वताच्या वनस्पती, जैवविविधता व ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व विषद केले यावेळी मार्गात कोणताही कचरा होणार नाही याची खास काळजी घेण्यात आली,

“आरोग्यदायी हृदयासाठी नियमित व्यायाम आणि सक्रिय जीवनशैली आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्वतः पुढाकार घेऊन समाजाला आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणे ही या उपक्रमाची विशेष बाब आहे,” असे अपोलो हॉस्पिटल्स नाशिकच्या व्यवस्थापनाने सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये ऑक्टोबरपूर्वी गारवा; किमान तापमान १८.५ अंशांवर

“Don’t miss the Beat..” Healthy Heart • Healthy Nashik”:
अपोलो हॉस्पिटल्स नाशिकचा ‘ट्रेकाथॉन २०२६’ हा केवळ ट्रेक नव्हता, तर हृदयाचे आरोग्य, फिटनेस, निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम ठरला. या उपक्रमातून सहभागी डॉक्टर आणि आरोग्यप्रेमींनी एकत्रितपणे ‘निरोगी नाशिक’ घडविण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता निमा न्यू नाशिक, फॅमिली फिजिशियन असोसिएशन, पंचवटी मेडिकल असोसिएशन, फॉरेस्ट डिपार्टमेंट व स्थानिक प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले.

Apollo Hospitals – Pioneering in Healthcare, Inspiring a Healthier Nashik.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790