नाशिक: जप्त गौण खनिजांचा जाहीर लिलाव आता १ सप्टेंबरला; तारखेत बदल

नाशिक। दि. २५ ऑगस्ट २०२६: नाशिक तहसील कार्यालयाच्या हद्दीत वाहतूक पथकाने अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करताना जप्त केलेल्या गौण खनिजाचा जाहीर लिलाव पूर्वी २८ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता.

मात्र, या दिवशी रक्षाबंधन सणाची शासकीय सुट्टी असल्याने लिलावाच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता हा लिलाव १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, नाशिक येथे होणार असल्याची माहिती तहसीलदार पंकजकुमार पवार यांनी दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई

लिलावात सहभागी होण्यासाठी आवश्यक अर्ज शुल्क रु. ५ हजार, अनामत रक्कम व लिलावाच्या अटी व शर्ती याबाबतचा सविस्तर तपशील तहसील कार्यालय, नाशिक येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. नाशिक जिल्ह्यातील नागरिक, व्यावसायिक तसेच संबंधित संस्था यांनी सुधारित तारखेस लिलाव प्रक्रियेत बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार श्री. पवार यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790