नाशिक: विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची १५ सप्टेंबर रोजी त्रैमासिक बैठक

नाशिक। दि. २५ ऑगस्ट २०२६: विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे होणार आहे. समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम हे अध्यक्षस्थानी असतील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई

या बैठकीसाठी ज्या नागरिकांना अर्ज सादर करावयाचे असतील त्यांनी समक्ष बैठकीच्या दिवशी तक्रार अर्ज सादर करावेत किंवा टपालाने सदस्य सचिव, विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती, नाशिक तथा पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक या पत्त्यावर पाठवावेत, असे भारत तांगडे, सदस्य सचिव, विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती, नाशिक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790