नाशिक: मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीमेत 79.82 टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण

नाशिक। दि. १८ ऑगस्ट २०२६: मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्याने मतदारांचे अर्ज संकलन व डिजिटायझेशनचे काम उत्कृष्टपणे केले असून, 17 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 51 लाख 4 हजार 458 मतदारांपैकी 40 लाख 74 हजार 214 अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 79.82 टक्के काम पूर्ण झाले असून, 20.18 टक्के म्हणजे 10 लाख 30 हजार 244 अर्ज विविध कारणांमुळे प्राप्त झालेले आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली SIR मोहिमेचे काम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आले. जिल्ह्यातील सर्व 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये उप जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच संबंधित मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, बीएलओ यांच्या अथक प्रयत्नामुळे EFs वितरणाचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून, अहवालानुसार एकूण कामाची पूर्तताही 100 टक्के नोंदविण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा 'या' दिवशी बंद राहणार

उत्कृष्ट कामगिरी करणारे विधानसभा मतदारसंघ:
SIR अर्जांच्या डिजिटायझेशनमध्ये जिल्ह्याच्या सरासरी 79.82 टक्के कामगिरीपेक्षा दिंडोरी (अ.ज.), इगतपुरी (अ.ज.), येवला, चांदवड आणि कळवण (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघांनी उल्लेखनीय प्रगती साधली आहे. दिंडोरीमध्ये 90.97 टक्के, इगतपुरीमध्ये 90.71 टक्के, येवल्यात 89.79 टक्के, चांदवडमध्ये 89.54 टक्के आणि कळवणमध्ये 89.68 टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. या मतदारसंघांमध्ये डिजिटायझेशनचे काम 89 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाल्याने SIR मोहिमेच्या अंमलबजावणीत या मतदारसंघांची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली आहे.

मतदारसंघनिहाय Uncollectable अर्ज:
SIR मोहिमेत काही मतदार उपलब्ध न होणे,(Absent) स्थलांतरित होणे, (Shifted)
मृत्यू (Death) अथवा दुबार नाव असणे (Double Name) (ASDD) या विविध कारणांमुळे त्यांचे अर्ज संकलित झालेले नाहीत. अशा स्वरूपातील Uncollectable प्रकरणांचीही नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे दोन सौम्य धक्के; नागरिकांमध्ये चिंता

उपलब्ध अहवालानुसार मतदारसंघनिहाय Uncollectable अर्जाची संख्या पुढीलप्रमाणे आहे:
नांदगाव – 44,754 (12.97 टक्के)
मालेगाव मध्य – 74,698 (23.47 टक्के)
मालेगाव बाह्य – 68,665 (17.62 टक्के)
बागलाण (अ.ज.) – 43,420 (14.46 टक्के)
कळवण (अ.ज.) – 31,347 (10.32 टक्के)
चांदवड – 32,616 (10.46 टक्के)
येवला – 33,805 (10.21 टक्के)
सिन्नर – 42,456 (12.97 टक्के)
निफाड – 48,218 (15.91 टक्के)
दिंडोरी (अ.ज.) – 30,255 (9.03 टक्के)
नाशिक पूर्व – 1,61,234 (38.72 टक्के)
नाशिक मध्य – 1,21,571 (34.67 टक्के)
नाशिक पश्चिम – 1,93,741 (39.28 टक्के)
देवळाली (अ.जा.) – 77,267 (26.05 टक्के)
इगतपुरी (अ.ज.) – 26,197 (9.29 टक्के). इतकी आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन !

जिल्ह्याची एकत्रित आकडेवारी पाहता 10 लाख 30 हजार 244 मतदारांचे अर्ज Uncollectable म्हणून नोंदविण्यात आले असून, त्याचे प्रमाण 20.18 टक्के आहे. Uncollectable प्रमाणाचा विचार करता नाशिक पश्चिममध्ये 39.28 टक्के, नाशिक पूर्वमध्ये 38.72 टक्के आणि नाशिक मध्य मतदारसंघात 34.67 टक्के प्रमाण नोंदविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इगतपुरीमध्ये 9.29 टक्के, दिंडोरीमध्ये 9.03 टक्के आणि येवला मतदारसंघात 10.21 टक्के Uncollectable प्रमाण आहे.

SIR मोहिमेच्या नियोजनानुसार पुढील काम निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कामाला आणखी गती दिली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित यंत्रणांकडून मतदारसंघनिहाय प्रगतीचा आढावा घेत कार्यवाही करणे सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790