नाशिक: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २२ ते १ ऑगस्ट दरम्यानविशेष आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर

नाशिक। दि. २१ जुलै २०२६: जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नाशिक येथे २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत विशेष आरोग्य तपासणी, जनजागृती आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. व्यंकट राऊळसाई अर्जुनराव गीते यांनी केले आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निर्देशानुसार तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत सर्वसामान्य नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी, आवश्यक वैद्यकीय सल्ला तसेच विविध आजारांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये कर्करोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, नेत्र तपासणी यासह हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता आदी आजारांचे निदान व मार्गदर्शन केले जाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: परिक्रमा मार्ग प्रकल्पासाठी मानोरी येथील शैक्षणिक संस्थेची जागा थेट खरेदीद्वारे संपादित

याशिवाय संसर्गजन्य रोगांचे प्रतिबंध व नियंत्रण याविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

दिनांकनिहाय शिबिरांचा तपशील
२२ जुलै २०२६
• रक्तदान शिबिर – चांदसी, नाशिक, यशवंत लॉन्स (वणी), स्टार लाईट कंपनी, नाशिक
• स्तन कर्करोग तपासणी व मॅमोग्राफी शिबिराची सुरुवात (२२ जुलै–१ ऑगस्ट)
• मुख कर्करोग कारणे, लक्षणे, तपासणी व उपचार विषयक पोस्टर प्रदर्शन (२२–२८ जुलै) – बाह्य रुग्ण विभाग
• मुख कर्करोग तपासणी शिबिर (२२–२५ जुलै)
• मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर (२२,२४ व २८ जुलै)
• हृदयरोग विषयावरील रांगोळी स्पर्धा
• लठ्ठपणा प्रतिबंध व नियंत्रण शिबिर – शहरी आरोग्य केंद्र, बिटको

२३ जुलै २०२६
• रक्तदान शिबिर – जे. डी. पवार कॉलेज ऑफ फार्मसी, कळवण
• स्तन कर्करोग विषयक पोस्टर स्पर्धा
• नेत्र तपासणी शिबिर (२३,२५ व २७ जुलै)
• हृदयरोग तपासणी शिबिर – बाह्य रुग्ण विभाग
• लठ्ठपणा प्रतिबंध व नियंत्रण शिबिर – प्राथमिक आरोग्य केंद्र, लहवित
• मानव दूध बँक (Human Milk Bank) जनजागृती अभियान

🔎 हे वाचलं का?:  पॉश कायदा: प्रभावी अंमलबजावणी करिता १५ ऑगस्टपर्यंत सर्व आस्थापनांनी अंतर्गत समिती स्थापन करण्याचे निर्देश

२४ जुलै २०२६
• स्तन कर्करोग जनजागृती शिबिर
• कर्करोग प्रतिबंध व नियंत्रण शिबिर – शहरी आरोग्य केंद्र, बिटको
• थॅलेसेमिया जनजागृती अभियान

२५ जुलै २०२६
• रक्तदान शिबिर- (२५ व २६ जुलै) -गोल्फ ब्लब मैदान नाशिक
• स्थूलता विषयावरील रील बनविण्याची स्पर्धा

२७ जुलै २०२६
• ऑनलाईन रक्तदान घोषवाक्य स्पर्धा
• हार्निया जनजागृती अभियान
• गर्भाशय मुख कर्करोग तपासणी (पॅप स्मिअर) व HPV संक्रमन व जसीकरण जनजागृती शिबिर
• अस्थी ठिसूळता (Bone Mineral Density) तपासणी शिबिर – बाह्य रुग्ण विभाग (सकाळी 10 ते दुपारी १)
• मुख कर्करोग तपासणी शिबिरातील संशयित रूग्णांची तपासणी (२७ व २८ जुलै )
• कर्करोग प्रतिबंध व नियंत्रण शिबिर – प्राथमिक आरोग्य केंद्र, लहवित
• स्थूलता जनजागृती शिबिर

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ : घाटांची कामे मार्च २०२७ पूर्वी दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश

२८ जुलै २०२६
• रक्तदान शिबिर- साईबाबा संस्थान शिर्डी
• व्हेरिकोज व्हेन्स जनजागृती अभियान
• गर्भाशय मुख कर्करोगावरील पथनाट्य
• अस्थी ठिसूळता (Bone Mineral Density) तपासणी शिबिर – बाह्य रुग्ण विभाग सकाळी १० ते दुपारी १)
• उच्च रक्तदाब तपासणी व जनजागृती शिबिर
• मधुमेह प्रतिबंध व नियंत्रण शिबिर – शहरी आरोग्य केंद्र, बिटको
• कृत्रिम अवयव व पुनर्वसन जनजागृती अभियान

३० जुलै २०२६
• स्तन कर्करोग तपासणी शिबिरातील संशयित रुग्णांची बायोप्सी तपासणी (३० जुलै ते १ ऑगस्ट )
• असंसर्गजन्य व्याधी (हृदयरोग, स्थूलता, मधुमेह आदी) विषयक पोस्टर स्पर्धा

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790