नाशिकच्या टपाल कार्यालयात २५ जून रोजी डाक अदालत

नाशिक। दि.१३ जून २०२६: डाक अदालत, वरीष्ठ डाक अधीक्षक, नाशिक डाक विभाग, जीपीओच्या बाजूला एन. डी. पटेल रोड, नाशिक यांच्या कार्यालयात २५ जून २०२६ रोजी दुपारी ४ वाजता डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डाकघरचे वरीष्ठ अधीक्षक प्रफुल्ल वाणी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  श्रीक्षेत्र कपिलधारा तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध- छगन भुजबळ

नाशिक विभागातील टपाल सेवेविषयीच्या ज्या तक्रारींचे निवारण ६ आठवड्यांत झालेले नाही, अशा तक्रारींचा डाक अदालतमध्ये विचार केला जाणार आहे. त्यासाठी तक्रार दोन प्रतीत वरीष्ठ डाकघर अधीक्षक, नाशिक डाक विभाग, नाशिक यांच्या कार्यालयात १८ जून २०२६ पूर्वी पोहोचतील, अशा रितीने पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790