नाशिक: वाहनांच्या बॅटरी चोरीप्रकरणी तीन महिलांना अटक; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक। दि. १२ मे २०२६: अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने वाहनांच्या बॅटरी चोरीप्रकरणी तीन महिलांना अटक करत सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत चोरीतील आणि इतर संशयित बॅटऱ्यांसह एकूण ३० बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये शारदा ईश्वर घोडे, उज्वला सुनील गडकरे आणि सुनीता कैलास साळवे (सर्व रा. गंजमाळ) यांचा समावेश आहे.

याप्रकरणी अक्षय प्रभाकर शेजोळे यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कर्मयोगी नगर परिसरातील आर.डी. सर्कलजवळील साईटवर उभ्या असलेल्या जेसीबी आणि डम्पर वाहनांच्या बॅटऱ्या ३ ते ४ मेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

त्यानुसार अंबड पोलिस ठाण्यात बीएनएस कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पांडवलेणी डोंगर परिसरात काही महिला चोरीच्या बॅटऱ्या विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचून झाडाझुडपांमध्ये थांबलेल्या तिन्ही महिलांना ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांनी आरोपींकडून चोरीतील १२ बॅटऱ्या तसेच इतर १८ संशयित बॅटऱ्या असा एकूण सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790