नाशिकमध्ये उष्णतेची लाट पुन्हा तीव्र; तापमानाचा पारा चाळिशीपार

नाशिक। दि. १० मे २०२६: शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा उन्हाचा कडाका वाढला असून कमाल तापमानाने चाळिशी ओलांडली आहे.

शनिवारी (दि. ९) नाशिकमध्ये ४०.१ अंश सेल्सिअस कमाल तर २३.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दिवसभर कडक उन्हाचा तडाखा आणि रात्री वाढलेला उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला कमाल तापमान ३७ अंशांच्या आसपास स्थिर होते, तर किमान तापमान २२ अंशांच्या पुढे कायम होते. त्यामुळे उन्हाची झळ फारशी जाणवत नसली तरी वातावरणात उकाडा होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

मात्र, गेल्या दोन दिवसांत तापमानात अचानक वाढ झाली आहे. शुक्रवारी २१.९ अंशांवर असलेले किमान तापमान शनिवारी सकाळी थेट २३.४ अंशांवर पोहोचले. अवघ्या २४ तासांत किमान तापमानात १.५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाचे दिवस पुढीलप्रमाणे नोंदविले गेले आहेत :

  • ११ व १३ मार्च : ३७.८ अंश सेल्सिअस
  • १४ एप्रिल : ३९.३ अंश सेल्सिअस
  • १९ एप्रिल : ३९.४ अंश सेल्सिअस
  • २३ एप्रिल : ३९.९ अंश सेल्सिअस
  • २५ एप्रिल : ४१.५ अंश सेल्सिअस
  • २६ एप्रिल : ४१.४ अंश सेल्सिअस
  • ९ मे : ४०.१ अंश सेल्सिअस

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790